प्रा. जगदीश चिमूरकर आचार्य पदवीने सन्मानित (Prof. Jagdish Chimurkar honored with Acharya title)
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर द्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा उपप्राचार्य प्रा. जगदीश चिमूरकर यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. प्रमोद एस. शंभरकरं यांच्या मार्गदर्शनात 'स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय सुधारणांमध्ये माहिती अधिकार अधिनियमाच्या भूमिकेचे विश्लेषणात्मक अध्ययन' या विषयावर शोधनिंबध सादर केला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोबरागडे, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, अड. राहुल घोटेकर, पल्लवी - घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर आदींच्या उपस्थितीत सत्कार केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या