बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालया इंग्लिश मीडियम कॉमर्स द्वारे दिनांक 3 ऑगस्ट 2025 ला वर्ग 9 वी व वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दिनांक 10 ऑगस्ट पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. त्यामध्ये के.जी.एन. कॉन्व्हेंटचा 10 वी चा विद्यार्थी अभिषेक डोनिवार प्रथम आला असून वीयाणी कॉन्व्हेंट ची 9 वी ची विद्यार्थीनी भाग्यश्री बंडी प्रथम आलेली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण एकूण 279 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बल्लारपुरातील एकूण 16 शाळांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वोदय विद्यालय, माउंट कॉन्व्हेंट, साईबाबा कॉन्व्हेंट, विद्याश्री कॉन्व्हेंट, वैभव कॉन्व्हेंट, दिलासाग्राम कॉन्व्हेंट, थापर हायस्कूल , आयडियल कॉन्व्हेंट, रमाबाई हायस्कूल , रेड रोज कॉन्व्हेंट, क्रिसेंट पब्लिक स्कूल, गांधी विद्यालय नी सहभाग घेतला. नववीचे विद्यार्थी समर्थ केशकर माउंट स्कूल, अर्पिता यादव आयडियल स्कूल, मुस्कान गीडवाणी दिलासाग्राम कॉन्व्हेंट, खुशाल राखुंडे साईबाबा कान्वेंट तसेच दहावीचे विद्यार्थी स्वरूप वासेकर सर्वोदय विद्यालय, प्राची मोडक विद्याश्री कॉन्व्हेंट, लवकुश निषाद एम. जे. एफ.स्कूल, अंकिता मंडल वैभव कॉन्व्हेंट, अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा असे प्राविण्य सूची मध्ये आलेले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी मारोती विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरिराज कडेल तसेच कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश देवाडकर उपस्थित होते. तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. पंकज कावरे अध्यक्षस्थानी होते आणि वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन बारावी इंग्लिश मीडियम कॉमर्स ची विद्यार्थिनी आफरिन नी केले. कार्यक्रमाची यशस्वितेसाठी कृष्णा लाभे, अदिती गहेरवार, दिव्या वर्मा, पल्लवी खनके यांच्या मदतीने पार पडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या