बल्लारपूर :- स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात संस्थापक स्व. सरदार अजितसिंह सोनी यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार होते. अतिथी म्हणून डॉ. एस. ए. गायकवाड आणि डॉ. संजय दुधे होते. डॉ. बहिरवार म्हणाले, "स्व .अजित सिंह सोनी हे वृक्षप्रेमी तर होतेच त्याबरोबरच त्यांना शैक्षणिक कार्याची आवड होती म्हणूनच कधीकाळी मागासलेल्या या परिसरात त्यांनी विज्ञान महाविद्यालयाचे स्थापना केली. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन लाभावा हा त्यांचा मूळ उद्देश होता. आजच्या घडीला असंख्य विद्यार्थी या महाविद्यालयातून घडले." डॉ. गायकवाड आणि डॉ. दुधे म्हणाले, "वृक्षप्रेमी स्व. अजितसिंहजी यांनी जवळच असलेल्या विरूर या गावी त्याकाळी सुंदर बाग निर्माण केली होती. या परिसराचे ते आकर्षण ठरले होते.' झाडे लावा, झाडे जगवा' या संदेशाची परिपूर्ती प्रत्येक व्यक्तीने तसेच शासनाने केली तर निसर्गाचा समतोल राखल्या जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. अधिकारी प्रा. जी. एस. घुगरे यांनी केले तर आभार डॉ. मनीषा जीवतोडे यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रा. से. यो. स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या