बल्लारपूर येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते घनश्याम मूलचंदानी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती (Senior Congress leader Ghanshyam Mulchandani from Ballarpur appointed as Secretary of Maharashtra Pradesh Congress Committee)
बल्लारपूर :- राज्यातील काँग्रेस संघटनेत व्यापक फेरबदल करण्यात आले असून, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नेतृत्वात बदल करत हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता सचिव, सरचिटणीस आदी पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची सरचिटणीसपदी निवड झाली असून, घनश्याम मूलचंदानी यांना सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या संघटनात्मक फेरबदलात बल्लारपूर येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते घनश्याम मूलचंदानी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी २९ जुलै २०२५ रोजी ही नियुक्ती जाहीर केली. घनश्याम मूलचंदानी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान, अनुभवी व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण झाले असून, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे घनश्याम मुलचंदानी यांच्यासह संतोषसिहं रावत, डॉ. सतिश राजूरकर, डॉ. दिलीप कांबळे, डॉ, संजय घाटे, प्रेरणा गौर, बंडू धोत्रे, व रोशनलाल बिट्टू यांची सुध्दा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या