बहुजन समाज पक्षाची पोंभुर्णा येथे आढावा बैठक संपन्न (Bahujan Samaj Party's review meeting concluded at Pombhurna)
पोंभुर्णा :- दि. २६/०७/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता बहुजन समाज पक्ष बल्लारपूर विधानसभेची चिंतन आणि आढावा बैठक पोंभुर्णा येथे संपन्न झाली. वरील बैठक मा. महेंद्र मकेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, बसपा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढवेल. कार्यकर्त्यांना पूर्ण तयारीने निवडणुका लढण्याचे आवाहन केले. मुख्य मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष माननीय रत्नाकर साठे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मुख्य मार्गदर्शक जिल्हा प्रभारी आणि बल्लारपूर विधानसभा प्रभारी माननीय राजेश ब्राह्मणे यांनी सांगितले की, कार्यकर्ते कॅडर कॅम्पद्वारे संघटना मजबूत करून निवडणुका लढू शकतात आणि सहज जिंकू शकतात. या बैठकीची ओळख माननीय किसन केसकर विधानसभा अध्यक्ष यांनी केली. कार्यक्रम विधानसभा सरचिटणीस माननीय विशिष्ट्य वाकडे यांनी केला. आभार प्रदर्शन पोंभुर्णा शहराध्यक्ष मा जयपाल उराडे यांनी केले. बैठकीला पोंभुर्णा तालुका अधिकारी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या