चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेचे आयोजन शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. सन 2026 करीता आयोजित या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 आहे. ही परीक्षा फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारमान्य शाळांमध्ये सध्या इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि ज्यांचे पालक जिल्ह्याचे रहिवासी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी https://cbseitms.nic.in/2024/nvsix किंवा https://cbseitms.nic.in/2024/nvxxi_11 या संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा. परीक्षेबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्वल भवितव्य घडवण्यासाठी नवोदय विद्यालय प्रवेश ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय प्राथमिक शाळांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, त्यांनी आपल्या अधिपत्याखालील विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करावे तसेच अर्ज प्रक्रियेसंबंधी येणाऱ्या अडचणींबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या