आदिवासी विकास विभागातर्फे 18 ते 22 जुलै दरम्यान चंद्रपूरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन (Tribal Development Department organizes Wild Vegetable Festival in Chandrapur from July 18 to 22)

Vidyanshnewslive
By -
0
आदिवासी विकास विभागातर्फे 18 ते 22 जुलै दरम्यान चंद्रपूरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन (Tribal Development Department organizes Wild Vegetable Festival in Chandrapur from July 18 to 22)


चंद्रपूर :-  सन 2025-26 मध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिवासी भागातील रानभाजी, रानफळे, वनऔषधे, अन्नधान्य आणि आदिवासी बांधवाच्या शबरी नॅचरल ब्रॅन्डच्या प्रिमीयम उत्पादनाची विक्री करून रोजगारांची संधी उपलब्ध होण्यासाठी आदिवासी विकास विभाग, चंद्रपूरच्यावतीने 18 ते 22 जुलै 2025 या कालावधीत शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये विशेषत: आदिवासी पट्टयामध्ये उपलब्ध असलेल्या पारंपरिक रानभाज्या गोळा करणे, शहराच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शहरी भागातील लोकांना रानभाज्यांचे आयुर्वेदिक तसेच त्यामध्ये उपलब्ध असलेली पोषणमुल्य यांचे महत्त्व पटवून देणे, आदिवासी बांधवांच्या प्रिमियम उत्पादनांच्या शबरी नॅचरल्स ब्रॅन्डला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, व या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या रानभाजी महोत्सवाचा महत्वाचा उद्देश आहे. दि. 18 ते 22 जुलै या कालावधीत मौलाना अब्दुल आझाद गार्डन, जयंत टॉकीज समोर, मेन रोड, चंद्रपुर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रकल्प कार्यक्षेत्रातील रानभाजी, रानफळे, वनऔषधे, अन्नधान्य इत्यादी क्षेत्रात संकलन, उत्पादन, करणाऱ्या नोंदणीकृत आदिवासी बचत गट, व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांचा सहभाग या महोत्सवामध्ये राहणार आहे. शहरातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवाला भेट देवून रानभाज्यांची ओळख, त्यांचे गुणधर्म, रेसिपी यांची माहिती जाणून घ्यावी. तसेच रानभाज्यांची खरेदी करून आदिवासी विक्रेत्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)