भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा व त्यावरील अशोकचक्र हा “22 जुलै 1947” रोजी भारतीय लोकशाहीचा अधिकृत ध्वज झाला (The national flag of India, the tricolor and the Ashoka Chakra on it, became the official flag of Indian democracy on “22 July 1947”.)

Vidyanshnewslive
By -
0
भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा व त्यावरील अशोकचक्र हा “22 जुलै 1947” रोजी भारतीय लोकशाहीचा अधिकृत ध्वज झाला (The national flag of India, the tricolor and the Ashoka Chakra on it, became the official flag of Indian democracy on “22 July 1947”.)


वृत्तसेवा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आपला राष्ट्र ध्वज.. भारताच्या ध्वज संहितेमध्ये अधिकृतपणे! भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे वर्णन केलेल्या डिझाइननुसार भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा “22 जुलै 1947” रोजी भारतीय लोकशाहीचा अधिकृत ध्वज झाला.भारतीय संविधान सभेच्या बैठकीत वर्तमान स्वरूपात स्वीकारला गेला.त्यानंतर भारतीय ध्वज म्हणून हा तिरंगा ध्वज कायम ठेवण्यात आला.भारतात “तिरंगा” हा शब्द बहुधा नेहमीच भारतीय राष्ट्रीय ध्वजाला सूचित करतो. आपला राष्ट्र ध्वज भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला! आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे फक्त रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे) आणि २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या! ध्वज समितीचे सभासद होते. त्या वेळी राष्ट्रध्वज कोणत्या स्वरूपाचा असावा याविषयी सर्वत्र चर्चा सुरू होती. या बाबतीत काही महाराष्ट्रीय नेत्यांनी आणि मुंबई प्रांतिक हिंदुसभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी! त्यांची भेट घेतली. वजनदार गोटातून या बाबतीत चळवळ होऊन प्रभावी लोकमत निर्माण झाले, तर आपण ध्वजाचा रंग भगवा असावा ह्या त्यांच्या सूचनेला ध्वज समितीत उचलून धरू असे त्यांनी अनंतराव गद्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि गावडे यांना अभिवचन दिले. १० जुलैला बाबासाहेब आंबेडकर जेव्हा! दिल्लीला जायला निघाले! तेव्हा सांताक्रूझ विमानतळावर मुंबई प्रांतिक हिंदुसभेचे नेते आणि काही मराठे पुढारी यांनी आंबेडकर विमानात बसायला! जातेवेळी त्यांना एक भगवा ध्वज अर्पण केला. १० जुलैला बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दिल्लीला जायला निघाले भगव्या ध्वजासंबंधी! तर चळवळ झाली, तर त्याला आपण पाठिंबा देऊ! असे त्यांनी त्यांना अभिवचन दिले.
            त्या वेळी मुंबई हिंदुमहासभेचे! नेते रावबहादूर सी. के. बोले, अनंतराव गद्रे यांना बाबासाहेब आंबेडकर विनोदाने म्हणाले, ‘‘एक महाराच्या मुलाकडून घटना समितीवर भगवा ध्वज लावण्याची अपेक्षा तुम्ही करता आहात नाही का?’’ ध्वज समितीमध्ये सात सदस्य होते,त्याचे अध्यक्षपद डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या कडे होते व बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू,मौलाना आझाद,के.एम मुन्शी,के.एम पाणीकर आणि ओ.सी.राजगोपालाचार्य ही सदस्य म्हणून होते.प्रत्येकाने आपापक्या परीने ध्वजासंबंधी सूचना केल्या! होत्या. हिंदुमहासभेमधून! सावरकर यांनी ध्वज पिवळ्या रंगाचा असावा व त्यात तलवार असावी असे मत मांडले तर मुस्लिम नेत्यांनी हिरवा ध्वज व त्यात अर्धचंद्र आणि त्यावर चांदणी असावी तर, कम्युनिस्टांनी! लाल रंगाच्या ध्वजाची मागणी केली, हिंदू नेत्यांनी भगवा रंग असलेला! ध्वज व त्यात ओम ची प्रतिकृती तर काँग्रेस आणि गांधीजी यांनी तिरंगा आणि त्यात चरखा असलेल्या ध्वजाची मागणी! केली होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणाल! की स्वातंत्र्य लढ्यात कोण्या एका धर्म/जात किंवा संप्रदायाने भूमिका बजावली नसून सर्व धर्माच्या लोकांनी यात सहभागी घेतला होता, म्हणून कोणत्याही एका धर्माला अनुसरून ध्वज ठरविणे योग्य नाही. अहिंसेचा,शांततेचा मार्ग असलेले प्रतीक असायला हवेत, त्यामुळे त्यांनी अशोकचक्र व त्याचे महत्व आणि पार्श्वभूमी सांगितली.
           धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा! संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. या चौरंगी असलेल्या ध्वजामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे असे! वैशिष्ट्य आहे, वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो! तर,मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते! दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो, तर, निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण! आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र’ या नावाने ओळखले जाते! यात बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांचे ते प्रतिक आहे.या द्वारे ते दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. सरतेशेवटी याच दिवशी सर्वानुमते चार रंग व मध्यभागी अशोकचक्र असलेला राष्ट्रध्वज समितीने “तिरंगा राष्ट्रध्वज” म्हणून घोषित करून स्वीकारण्यात आला

संकलन :- मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)