बल्लारपूर :- कोणतीही चळवळ युवकांच्या सक्रिय सहभागाशिवाय पुढ़े जाने शक्य नाही. तेव्हा धम्म वृद्धिसाठी युवकांनी पुढे यावे असे आव्हान त्यांनी केले. भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारा बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी वरिल उद्गार काढ़ले. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना धम्ममित्र भास्कर भगत यांनी बुद्धजयंतीचे महत्व विशद केले. सुरुवातीला त्रिशरण पंचशील घेण्यात आले. मराठीतून पंचशील मयंक वाघमारे,तर विधायक पंचशील निनाद धोपटे यांनी वदवुन घेतले. आशु वनकर आणि सहकारी यांनी " अंगुलिमालाची धम्मदीक्षा" या लघुनाटिकीचा अतिशय सुंदर प्रयोग सादर केला. याप्रसंगी नेत्रदान व देहदान करणाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमानंद भडके, प्रास्ताविक तुळशीदास खैरे,तर आभार प्रदर्शन संगिताताई घोटेकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्याने उपस्थिती होती. कार्यक्राच्या यशस्वीतेसाठी ताराचंद थुल, तुलसीदास खैरे, प्रकाश देवगडे, जयदास भगत, संपत कोरडे, अंबादास मानकर, गोकुल वाघमारे, बाळू महेशकर, राहुल रावळे, रवी खोब्रागडे, नरेंद्र जानगे, अशोक दुपारे, संदीप निखाडे,आदींनी सहकार्य केले .
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या