वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून वैभवी देशमुख ने 12 वीच्या परीक्षेत मोठे यश (Vaibhavi Deshmukh, putting aside the grief of her father's death, achieved great success in her 12th exams.)

Vidyanshnewslive
By -
0
वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून वैभवी देशमुख ने 12 वीच्या परीक्षेत मोठे यश (Vaibhavi Deshmukh, putting aside the grief of her father's death, achieved great success in her 12th exams.)


वृत्तसेवा :- बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येने कुटुंबीय हादरले असतानाच त्यांची कन्या वैभवी देशमुख बारावीची परीक्षा देत होती. त्यामुळे तिच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारावीच्या परीक्षेत वैभवी देशमुखने 85.33 टक्के इतके मार्क्स मिळवलेत. वडिलांच्या मृत्यूचे आभाळाएवढं दुःख घेऊन वैभवीने परीक्षा दिली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले. या निकालानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतर वडिलांना न्याय मिळावा यासाठी आपले चुलते धनंजय देशमुख यांच्यासोबत वैभव महाराष्ट्रभर फिरत होती. नेत्यांच्या गाठीभाठी घेत त्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करत होती. डिसेंबरमध्ये तिच्या वडिलांच्या हत्या झाली तेव्हापासून ती न्याय मागत होती. आंदोलन करत होती. या काळात तिचा नीटसा अभ्यासही झाला नाही. दरम्यान. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. यात इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत. या निकालानंतर तिने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)