महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 88.00 टक्के (Mahatma Jyotiba Phule College's 12th result is 88.00 percent)
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चा बारावीचा एकूण निकाल 88.00 टक्के लागलेला असून कला शाखेचा 67.00% विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून कला शाखेतून सुप्रिया मावलीकर प्रथम आली असून तिला 72.50 टक्के गुण मिळाले.
त्याचप्रमाणे मराठी माध्यम वाणिज्य विभागाचा निकाल 88.00% लागला असून वाणिज्य विभागातून प्रथम क्रिष्टो सोबी ला 77.33 टक्के गुण प्राप्त झालेले आहे. अशाच प्रकारे वाणिज्य विभागातील इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून जेसीका मातंगी ला 66.00 टक्के मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेश भाऊ चिताडे तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिवाकर मोहितकर आणि इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक कृष्णा लाभे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि महाविद्यालयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
विशेष म्हणजे बल्लारपूर तालुक्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय च्या माध्यमातून देशासेवेसाठी तत्पर असणारा सैनिक हा एनसीसीच्या माध्यमातून घडवीला जातो. विद्यार्थ्यामध्ये स्वयंशिस्त लाभावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसची शिबीर आयोजित केले जातात, गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून कमवा व शिका ही योजना राबविण्यात येते आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत करून देण्याची संधी देणारे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय असून विद्यार्थ्यामध्ये वाचनाची तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रशस्त ग्रंथालय तसेच गेस्ट लेक्चर ई चे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या