बल्लारपूर :- जीआरपी पोलीसांनी एका मोबाईल चोराला ताब्यात घेतले असून त्याच्या कडून ५ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. जीआरपी पोलीस मध्ये अपराध क्रं ४३०/२०२४ व ४३५/२०२४ चे मोबाईल चोरीची तक्रार होती. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना जीआरपी रेल्वे वर्धा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक चे पोअं पंकज भांगे व पोअं संदेश लोणारे यांना खबरी कडून गुप्त माहिती मिळाली की आरोपी तुळशीदास राठोड वय ३२ वर्ष रा. गडचांदुर जि चंद्रपूर हा रेल्वे गाडीत मोबाईल चोरी करतो. त्यावरून जीआरपी रेल्वे वर्धा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता अपराध क्रं ४३०/२०२४ मधील वन प्लस मोबाईल किंमत २८ हजार रुपये चोरले म्हणून मान्य केले तसेच अपराध क्रं ४३५/२०२४ मधील रेडमी नोट मोबाईल द्वारे ८ लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रांजिक्शन करून रक्कम काढले. तसेच तो मोबाईल गोवा येथे विकल्याचे सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या कडून ३ मोबाईल हस्तगत केले. सदर ची कारवाई जीआरपी चे पोलीस अधिक्षक डॉ प्रियंका नारनवरे, अपर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन चे ठाणेदार हर्षल चापले, गुन्हे शोध पथक चे पोलीस हवालदार संतोष वडगिरे, पोअं पंकज भांगे, पोअं संदेश लोणारे, पोअं चंदन डेहनकर, चालक पोअं काशिनाथ केंद्रे यांनी केले. पुढील तपास जीआरपी चे पोलीस हवालदार अन्सार खान, महिला पोलिस हवालदार सविता मेश्राम करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या