स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप, गाव विकास आराखडा तयार करण्याकरीता स्वामित्व योजना महत्वपुर्ण ठरेल - प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Ownership scheme will be important for allotment of charters to beneficiaries under ownership scheme, preparation of village development plan - In-charge Collector Vivek Johnson)

Vidyanshnewslive
By -
0
स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप, गाव विकास आराखडा तयार करण्याकरीता स्वामित्व योजना महत्वपुर्ण ठरेल - प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Ownership scheme will be important for allotment of charters to beneficiaries under ownership scheme, preparation of village development plan - In-charge Collector Vivek Johnson)


चंद्रपूर :- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांपासून देशातील गाव, खेड्यातील लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा नव्हता. नागरिकांना कोणताही अधिकृत कागदपत्र व जमीन मालकीचा पुरावा नसल्यामुळे बँकेकडून जमिनीवर कर्ज मिळत नव्हते. स्वामित्व या महत्वपुर्ण योजनेद्वारे नागरिकांना आर्थिक स्वरुपाचा विकास साधता येणार आहे. गावांमधील जमिनी व सिमाकंनाच्या बाबतीत असलेले वाद मिटविण्यासाठी स्वामित्व योजना वन स्टॉन सोल्युशन आहे. त्यासोबतच, गाव विकास आराखडा तयार करण्याकरीता स्वामित्व योजना महत्वपुर्ण ठरेल, असे मत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले. नियोजन भवन सभागृह येथे स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कार्यक्रमाला आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, सुधाकर अडबाले, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मीना साळुंखे, जिल्हा अधीक्षक (भुमि अभिलेख) भूषण मोहिते, डॉ. मंगेश गुलवाडे, ग्रामसेवक, सरपंच तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.


        जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यातील 82 गावांमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणायचे. गावाचा बहूआयामी विकास तसेच कायापालट करण्यासाठी कार्य हाती घेण्यात आले आहे. पूर्वी जमिन मालमत्तेचा कच्चा नकाशा मिळायचा. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन सर्वेक्षणाद्वारे गावठाण तसेच मालमत्तेचा अधिकृत नकाशा मिळत आहे. नागरिकांना अधिकृत कागदपत्र आणि जमीन मालकीचा पुरावा नसल्यामुळे बँकेकडून जमिनीवर कर्ज मिळत नव्हते. आता जमिनीचा अधिकृत पुरावा आणि जमिनीचा मालक शेतकरी असल्यामुळे त्या जमिनीवर शेतकऱ्याला कर्ज घेणे अधिक सोपे होणार आहे. याद्वारे नागरिकांना आर्थिक विकास साधता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मालकी हक्काचे जतन करणारी सनद प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्वामित्व योजनेअंतर्गत 50 हजार गावातील 58 लक्ष लोकांना स्वामित्व प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर महत्त्वाच्या विषयावर देशाचे पंतप्रधान यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रमाणपत्राच्या बाबतीत क्रांतिकारी निर्णय अंमलात आणला. चंद्रपूर जिल्हा कुठेही मागे नाही हे सिद्ध करत साधारणत: एकूण 1 लक्ष 47 हजार 684 इतकी मिळकतीची रक्कम आहे. स्वामीत्व प्रमाणपत्राच्या वाटपात जिल्ह्याने पुढाकार घेतला याबद्दल श्री मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी आमदार सुधाकर अडबाले व आमदार देवराव भोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दूरदृश्य प्रणालीद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 50 हजाराहून अधिक गावांमधील लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप चंद्रपूर तालुक्यातील मौजा शेनगाव येथील लाभार्थी घुलाराम धांडे, नथ्थु चटकी, अमोल वैद्य, विकास वैद्य, नामदेव खारकर, भद्रावती तालुक्यातील मौजा चपराळा येथील महादेव लेडांगे, राजू वासुदेव ठाकरे, राजुरा तालुक्यातील मौजा तुलाणा येथील निळकंठ राऊत, पुरुषोत्तम अलोणे, वरोरा तालुक्यातील मौजा पांझुर्णी येथील कवडू हनुमंते, भारती पुसनाके आदि लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात आले. तत्पुर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे यांनी उपस्थितांना स्वच्छता व नशामुक्तीची शपथ दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)