स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, घरफोडी करणाऱ्यास ३ लाख ६७ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of local crime branch, property worth 3 lakh 67 thousand 690 rupees seized from burglar)
चंद्रपूर :- १७ जानेवारी ला पोलीस स्टेशन घुग्गुस ता.जि. चंद्रपूर गु.र.नं ३६८/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता मधील आरोपीचे संदर्भात प्राप्त गोपनीय माहितीचे आधारे मोहम्मद सरफरोज शागीर शाह (२४) रा. रयतवारी कॉलरी, आमटे लेआउट, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन चोरीस गेले मालाबाबत विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा व पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत आणखी दोन घरफोड्या दोन विधी संघर्षित बालकासह केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने घुग्गुस व चंद्रपूर येथील घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक करून सोने चांदीचे दागिने ३ लाख ६७ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केले. त्यानुसार सदर गुन्हयातील व इतर गुन्हयातील चोरीस गेले सोन्याचे दानिने, चांदीचे दागिने व वस्तु, गुन्हयात वापरलेली मोपेड ॲक्टिवा असा एकुण ३ लाख ६७ हजार ६९० रुपयांचा माल जप्त करण्यात आले. आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन घुग्गुस यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो. स्टे घुग्गुस करीत आहे. सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचा मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा जंयता चुनारकर, पोहवा नितेश महात्मे, पोशि अमोल सावे, पोशि प्रफुल्ल गारघाटे, पोशि किशोर वाकाटे, महिला अंमलदार अपर्णा मानकर, दिपीका सोडणार, वाहनचालक दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या