बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारे संचालित स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र विभाग (एनसीसी विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी व आर्मी दिन 15 जानेवारी दोन्ही कार्यक्रम संयुक्त रित्या साजरे करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. नितीनजीं हिरुरकर, सामाजिक सदभाव कार्य प्रमुख जिल्हा चंद्रपूर, मा. सचिन तल्लार, समुपदेशक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, मा. श्रुती तल्लार, सामाजिक कार्यकर्ता, डॉ. विनय कवाडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, एनसीसी विभाग प्रमुख ई ची विचार मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून झाली तदनंतर अतिथीचे मार्गदर्शन पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. योगेश टेकाडे यांनी केले मार्गदर्शन करतांना नितीनजी हिरुरकर यांनी ' स्वामी विवेकानंद आणि भारतीय युवा ' या विषयावर मार्गदर्शन करतांना प्रत्येक विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टीने विचार करतांना प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करायला पाहिजे तसेच देशप्रेमा विषयी जागृत असले पाहिजे. यानंतर मार्गदर्शन करतांना मा. सचिन तल्लार यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक काळजी घेतांना चांगल्या वाईट वर्तणुकीविषयी आपल्या पालकांना विश्वासात घेतले पाहिजे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनय कवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. सतिश कर्नासे, डॉ. पंकज कावरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. जयेश गजरे, प्रा. विभावरी नखाते, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या