बल्लारपूर -: महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम राबविण्यात येत असून दिनांक एक ते पाच जानेवारी यादरम्यान वाचन संकल्प पंधर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत ग्रंथालय विभाग व एनएसएस च्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील ग्रंथालयाची स्वच्छता करण्यात आली त्यामध्ये ग्रंथालयातील पुस्तकांची स्वच्छता तसेच महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी दीप प्रज्वलन व माल्या अर्पण करून करण्यात आले त्यामध्ये एक जानेवारी ग्रंथालयात वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले जीवनावरील प्रकाशित पुस्तकांवर सुद्धा ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. पंकज कावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्वप्निल बोबडे सर यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. विनय कवाडे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. किशोर चौरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा.पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रकाशजी मेश्राम, अशोकजी गर्गेलवार, सिद्धार्थ मोरे, शामराव दरेकर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या