बल्लारपूर शहरातील जमजम पठाण कोण बनेगा करोडपतीच्या हॉटसीट वर, 6 व 7 जानेवारीला प्रसारित होणार (Jamjam Pathan from Ballarpur city will be seen on the hot seat of Kon Banega Crorepati, on January 6 and 7 on Sony TV.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर शहरातील जमजम पठाण कोण बनेगा करोडपतीच्या हॉटसीट वर, 6 व 7 जानेवारीला प्रसारित होणार (Jamjam Pathan from Ballarpur city will be seen on the hot seat of Kon Banega Crorepati, on January 6 and 7 on Sony TV.)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड निवासी जमजम महमूद पठाण ही कोण बनेगा करोडपती मध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस चे पदाधिकारी महमूद पठाण यांची मुलगी जमजम पठाण ही ६ जानेवारी रोजी सोनी टीव्हीवर दाखविली जाणारे कोण बनेगा करोडपती चा हॉट सीट वर दिसणार आहे. जे ६ व ७ जानेवारी रोजी सोनी टीव्हीवर रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार. जमजम पठाण ही यूपीएससी ची तयारी करत असून ती कॉम्प्युटर सायन्स मध्ये बी ई झाले आहे. तिला लहानपणा पासुन सामान्य ज्ञान ची आवड असून तिचे दहावी पर्यंत शिक्षण दिलासाग्राम कॉन्व्हेन्ट बल्लारपूर तर १२ वी माउंट सायन्स कॉलेज मधून परीक्षा दिली. ती बी ई शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथून कॉम्प्युटर सायन्स मध्ये केले. तिच्या आई चे निधन २०१४ मध्ये झाल्यानंतर तिच्या कडे सर्व लक्ष वडील महमूद पठाण देत आहे. तिच्या या कामगिरीने  नागरिकांनी शुभेच्या चे वर्षाव केले आहे. व सर्व स्तरातून स्वागत होत आहे. एक बल्लारपूर कर कोण बनेगा करोडपती च्या हॉटसीट पर्यंत पोहोचला ही अभिमानास्पद बाब आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)