बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने 193 वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून वंदन करण्यात आले यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल सर, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. मोहनीश माकोडे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. रजत मंडल सर यांनी " स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांची भूमिका महत्वाची असून खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांच्या खांद्याचा खांदा लावून समाज प्रबोधनाचे कार्य केले. विशेष म्हणजे सावित्रीबाईनी त्या काळात मुलींसाठी एकूण १८ शाळा काढल्या." या कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम यांनी केले.
यावेळी डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. किशोर चौरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. पंकज कावरे प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या