भारताच्या स्त्री शिक्षणाची प्रणेती सावित्रीबाई ज्योतीराव फुले (Savitribai Jyotirao Phule, the pioneer of women education in India)
वृत्तसेवा :- महिलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांना खूप मोठ्या संर्घषाचा सामना करावा लागला. त्यांनी जिद्द सोडली नाही. त्या स्वःताह निरक्षर होत्या, पण नंतर त्यांनी ज्योतिबांच्या मदतीने शिक्षणाचे धडे गिरवले आणि पुढे तिच शिकवण त्यांनी महिलांना दिली. ज्या काळात महिला चूल आणि मुल या बेडीत अडकलेली होती. त्याकाळी सावित्रीबाईंनी ही बिडी मोडीत काढली आणि महिलांनाही शिक्षणाचा हक्क आहे असं सामाजाला ठणकावून सांगितलं. या सगळ्यात त्यांना साथ लाभली ती जोतिबा फुले यांची. सावित्रीबाई फुले यांची आज १९३ वी जयंती आहे. सावित्रीबाईंना 'सावित्रीमाई' असे देखील म्हटले जाते. आज प्रत्येक महिला शिक्षण घेऊन तिला हव्या त्या क्षेत्रात नाव करीत आहे, याचं सर्वांत मोठं कारण आहे त्या सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १३ वर्षांच्या जोतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांच शिक्षण तिसरेपर्यंत झालं होतं. १९४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम केलं. १८४८ ते १९५२ या काळात त्यांनी मुलींसाठी एकूण १८ शाळा काढल्या. २८ जानेवारी १८६३ मध्ये बाहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून प्रसूतिगृहही स्थापन केले, त्याच्या देखरेखेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याकाळी महिलांनी शिक्षण घेण्यासाठी लोकांचा प्रचंड विरोध असायचा. तरीही सावित्रीबाईंनी कधी हार मानली नाही, त्यांनी आपला विचार पक्का करूनच त्या लढत राहिल्या. त्या शाळेत जात असताना लोकं त्यांच्यावर दगड, कचरा, चिखल फेकायचे. या सर्व आव्हांनाचा सामना करीत त्यांनी महिलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मौलिक कार्य केले. सावित्रीबाई फुले यांचे पती जोतिबा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी शिक्षणाच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा खंड कधी पडू दिला नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या, विशेषत: महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यात गेले. सावित्रीबाई फुले या मोठ्या साहित्यिकही होत्या. काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. १८९६-९७ साली पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला होता. प्लेग या जीवघेण्या आजाराने अनेकांचा जीव घेतला. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांची सेवा करु लागल्या. त्यांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समस्त मानवजातीला भूषणावह आहे म्हणूनच जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन !
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या