महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटें यांचा वाढदिवस निमित्ताने बल्लारपूरात रुग्णांना फळवाटप (Maharashtra State Marathi Journalists Association State President Vasant Munde and State General Secretary Vishwasrao Aroten distributed fruits to patients in Ballarpur on the occasion of their birthday.)
बल्लारपूर :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटें यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी साजरा होत असून चंद्रपूर जिल्ह्यात यंदाही उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी दिली आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना फळ व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन मेश्राम, मा.सुनिल गाडे पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले होते.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संघटने तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले यावेळी तालुका संघांचे अध्यक्ष मनोहर दोतपल्ली, तालुका सचिव दिपक भगत, वसंत मून, देवानंद देशभ्रतार, निळकंठ मजगवळी, गौतम कांबळे, लखपती घुगलोत, मिलिंद पुणेकर, संतोष बडकेलवार, ई ची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या