ब्रह्मपुरीच्या धम्मभूमीवर उद्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन (Buddhist Dhamma Parishad will be organized tomorrow at Brahmapuri Dhammabhoomi)
ब्रम्हपूरी :- धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ब्रह्मपुरी येथे रविवारी दि. 12 जानेवारी 2025 ला 7 व्या बौद्ध धम्म परिषदचे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती बौद्ध धम्म प्रचारक गुणवंत दोर्लीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय भिक्खू महासंघ व बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष प. पूज्य भदंत आनंद महाथेरो, गडचिरोली येथील अरण्यवास बुध्द विहार नाला संगम कोटरी येथील प. पूज्य भदंत भागीरथ महाथेरो, येनाडा येथील धम्मप्रकाश विपश्यना केंद्राचे पूज्य भदंत सत्यानंद महाथेरा, पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो, जि. गडचिरोली, पूज्य भदंत अश्वघोष महाथेरो ब्रम्हपुरी, पूज्य भदंत अभय नायक महाथेरो यांच्यासह नागपूर भिक्खू संघ उपस्थित राहणार असून, सत्कारमूर्ती आमदर विजय वडेट्टीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मनोज काळबांडे, मार्गदर्शक पी. एस. खोब्रागडे, प्रा.डॉ. राजकुमार शेंडे, अड. राम मेश्राम प्राचार्य देवेश कांबळे, प्रा. भाग्यवान खोब्रागडे, डॉ. इंद्रजित नागदेवते, अशोक रामटेके, सुशीला भगत, सोनूताई रामटेके, आदींची उपस्थिती राहणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या