बल्लारपूरातील दलित पँथरचे नेते बाळकूणाल आमटे यांच दुःखद निधन (Balkunal Amte, the leader of Dalit Panthers in Ballarpur, died tragically)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरातील दलित पँथरचे नेते बाळकूणाल आमटे यांच दुःखद निधन (Balkunal Amte, the leader of Dalit Panthers in Ballarpur, died tragically)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ आंबेडकरी नेते पँथर बाळकुणाल आमटे यांचे निधन आज रात्री १२.३० वाजता त्याच्या राहते घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. बाळकुणाल आमटे हे दलित पँथरचे स्थापनेपासून नेते होते. त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पँथर नेते नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार यांचा सारखे धुरंदर नेत्या सोबत राहून दलित पँथरचे काम केले होते. ७० - ८० दशकात दलित अत्याचार विरोधात ते विदर्भात फिरले होते. रिडल्स इन हिंदूजम बुकच्या वेळी जातीय तणाव वेळी ते विदर्भ पिंजून काढले होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रिय होते. त्यावेळी जेलभरो आंदोलनात त्यांना जेल मध्ये ठेवले होते. त्यांच्या निधनाने समाजात शोक पसरले आहेत. बाळकुणाल आमटे हे येथील ॲड सुमित आमटे प्रिती आमटे यांचे वडील आहेत. त्यांची अंतिमयात्रा दुपारी 3 वाजता जय भीम चौक येथून निघून वर्धा नदीच्या सम्शाण घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)