बल्लारपूर पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांची तडकाफडकी बदली, श्याम गव्हाणे यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी वर्णी 14 जानेवारीला स्वीकारला पदभार (Ballarpur Police Inspector Sunil Gade transferred immediately, Shyam Gavane assumed charge as Ballarpur Police Inspector on January 14.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांची तडकाफडकी बदली, श्याम गव्हाणे यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी वर्णी 14 जानेवारीला स्वीकारला पदभार (Ballarpur Police Inspector Sunil Gade transferred immediately, Shyam Gavane assumed charge as Ballarpur Police Inspector on January 14.)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहराला मिनी इंडिया म्हणून ओळखलं जात विविध राज्यातून आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी लोक येतात व याच शहरात वास्तव्याला असतात चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच शहर म्हणून बल्लारपूर शहराची ओळख तर आहेच पण ऐतिहासिक गोंडकालीन इतिहासाची परंपरा, उच्च दर्जाचा सागवान लाकडाची वसाहत, उच्च दर्जाचा कागद निर्मितीचा कारखाना तसेच दक्षिण रेल्वे, दक्षिण-पूर्व रेल्वे व मध्य रेल्वेच बल्लारशाह जनक्शन आहे व अशा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कोणत्याही अधिकाऱ्यांची या शहराला पसंती असते यशवंत ओबासे, उमेश पाटील, सारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला मात्र वाढत्या शहरीकरण व विस्तारमुळं शहरातील कायदा व सुव्यवस्था बरोबर गुन्हगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे. मागील काही दिवसात बल्लारपूर शहरातील अनेक वॉर्डातील नागरिकाकडून अग्निशस्त्र आढळून आली. अशातच नुकतीच 2 दिवसापूर्वी ज्यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असते तेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी 50,000 रु च्या लाच प्रकरणात अडकले नव्हे तर अटकेपूर्वीच पसार झाले बल्लारपूर चे ठाणेदार सुनील गाडे यांना पोलीस उपनिरीक्षक यांचे लाच प्रकरण चांगलेच भोवले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आले आहे. लाच प्रकरणात फिर्यादी ने पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे सुद्धा नाव तक्रारीत नमूद केले असल्याची माहिती असून यामुळेच तर पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आले नसेल अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.यामुळे पोलीस प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातर्गत बदल्याचे आदेश पारित केले यानुसार श्री सुनिल गाडे, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांची पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथे बदली करण्यात आली तर आर्थिक शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री श्याम गोविदराव गव्हाणे यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी वर्णी लावण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांची ७ महिन्यात बदली झाली आहे. त्यांच्या अगोदर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची सुद्धा ४ महिन्यात बदली झाली. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच अवैध दारू विक्री, जुगार, सट्टा तसेच इतर अनेक बाबीवर नियंत्रण आणण्याचे आवाहन या नवीन पोलीस निरीक्षकाना करावे लागणार आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)