सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार व राज्यशास्त्राचे प्राध्यापक मनोहर सप्रे यांचं वृद्धापकाळाने निधन (Well-known cartoonist and political science professor Manohar Sapre passed away due to old age)

Vidyanshnewslive
By -
0
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार व राज्यशास्त्राचे प्राध्यापक मनोहर सप्रे यांचं वृद्धापकाळाने निधन (Well-known cartoonist and political science professor Manohar Sapre passed away due to old age)


चंद्रपूर :- सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्रा. मनोहर सप्रे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. सप्रे यांनी चंद्रपुरात त्यांच्या सरकारनगर येथील आपल्या राहत्या घरी आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. केसरी, तरुण भारत, लोकमत, लोकसत्ता आदी आघाडीच्या वर्तमानपत्रातून रोज प्रकाशित होणारी त्यांची व्यंगचित्रे त्यातील अभिजाततेनं लक्षवेधी ठरली. त्यांच्या निधनाने मराठी-इंग्रजी माध्यमातील रेखाचित्रांचा अनुभवी साधक हरपला आहे. दीर्घकाळ वर्तमानपत्रे आणि मासिकातून त्यांनी व्यंगचित्र रेखाटने आणि पर्यावरण संवर्धन विषयक जाणीव जागृती केली. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर चंद्रपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उत्तम लेखक, वक्ते आणि वने-वन्यजीव चळवळीतील कार्यकर्ते म्हणून मनोहर सप्रे यांची ओळख होती. तसंच सप्रे यांनी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण यांच्यासोबत काम केलं होतं. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात त्यांनी 22 वर्षे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ व्यंगचित्र रेखाटन आणि पत्रकारिता केली. सांजी, मनोहारी, दहिवर, हसा की , व्यंग विनोद, व्यंगार्थी, रुद्राक्षी, अलस-कलस आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. पत्रकारिता, साहित्य, वनसंवर्धन क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारानी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या निधना पश्चात दोन मुलं नितीन व मिलिंद, पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच आशिष देव त्यांचे मानस पुत्र म्हणून ओळखले जातात. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)