आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या., अमित शहांचं राज्यसभेत वादग्रस्त वक्तव्य; संसदेत विरोधक आक्रमक, जय भीमच्या घोषणा (Take the name of God instead of Ambedkar., Amit Shah's controversial statement in the Rajya Sabha; Opposition aggressive in Parliament, slogans of Jai Bhim)
वृत्तसेवा :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मंगळवारी राज्यसभेमध्ये भाषणादरम्यान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये 'एक देश, एक निवडणूक' विधेयक मांडण्यात आलं. यावर विरोधकांनी सदर विधेयक हे संविधानविरोधात आहे असा आक्षेप घेतला. बाबासाहेबांच्या संविधानाच्याविरोधात हे विधेयक असून संघराज्य पद्धतीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. यावरुन अनेक खासदारांनी आपली भूमिका सदनासमोर मांडली. त्यानंतर या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांनावर निशाणा साधला. मात्र भाषणाची सुरवात करताना त्यांनी आंबेडकरांचं नाव घेतलं. मात्र त्यांची नाव घेण्याची शैली सध्या टीकेचा विषय ठरत आहे. " आता एक फॅशन झाली आहे. आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग लाभला असता," असं अमित शाहांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधताना लोकसभेतील भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं. याच मुद्द्यावरुन आता विरोधकांनी अमित शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. ज्या पद्धतीने अमित शाहांनी अनेकदा आंबेडकरांचं नाव घेतलं ते अपमानास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अमित शाहांच्या या विधानाचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत अमित शाहांवर निशाणा साधला आहे, "बाबासाहेबांचा असा अपमान केवळ आणि केवळ तीच व्यक्ती करु शकते जिच्या मनात बाबासाहेबांच्या संविधनाबद्दल द्वेष आहे. ज्यांच्या पुर्वजांनी शोषित आणि वंचितांसाठी दूत असलेल्या बाबासाहेबांचे पुतळे जाळले तेच असं बोलू शकतात. या संघाच्या लोकांना बाबाबासाहेबांच्या नावाचा एवढा त्रास का होतो? त्यांना या नावाबद्दल इतकी घ्रृणा का आहे?" असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला आहे. अमित शाहांच्या या विधानावरुन विधानसभेच्या तिसऱ्या दिवसाच्या अधिवेशनाआधीही अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड यासारख्या विरोधीपक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या