चंद्रपूरात " वार्तालाप " अंतर्गत प्रसारमाध्यमाच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन, विविध विषयावर प्रसासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होणार (A one-day media workshop will be organized under "Vertalap" at Chandrapur, administrative officers will be guided on various topics.)
चंद्रपूर :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने निमंत्रित पत्रकारांसाठी 17 डिसेंबर मंगळवार रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा -वार्तालाप' चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सत्रा नंतर मुख्य वन संरक्षकआणि प्रकल्प संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, जितेंद्र रामगावकर हे मुख्य भाषण करतील. देशभरातील पत्रकारांसोबत संवाद साधण्यासाठी, जिल्ह्यांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी 'वातालाप' या नावाने ग्रामीण माध्यम परिषदा पत्र सूचना कार्यालयाद्वारे नियमितपणे आयोजित केल्या जातात. या परिषदांमुळे सरकारच्या धोरणे, कार्यक्रम आणि योजनांची प्रभावी माहिती जिल्हा आणि तळागाळातील माध्यमांपर्यंत पोहोचवणे सोपे होते. पत्र सूचना कार्यालय हे भारत सरकारचे प्रमुख संस्थान आहे, जे सरकारच्या धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि कामगिरीची माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत पोहोचवते. हे ब्युरो नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार आणि माध्यमे यांच्यातील मुख्य दुवा आहे. संवर्धन आणि विकास या संदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रयत्न' या संकल्पनेशी निगडीत हा वार्तालाप असणार आहे. चंद्रपूरच्या बापट चौक येथील हॉटेल एन .डी . येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 यावेळेत आयोजित या कार्यशाळेत उद्घाटन सत्रानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधीसाठी विविध विषयावरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या तांत्रिक सत्रा मध्ये 'वन्यजीव संवर्धन आणि प्रसार माध्यमांची भूमिका' यावर पियुशा जगताप (भारतीय वन सेवा) सादरीकरण करतील. त्यानंतर 'पर्यावरण वने आणि विकास या विषयावरील वृत्तांकन' यावर केंद्रीय संस्कृत विद्यापीठातील सल्लागार मंगेश इंदापवार मार्गदर्शन करतील . तिसऱ्या तांत्रिक सत्रा मध्ये 'चंद्रपूर क्षेत्रामध्ये पर्यावरणीय शाश्वती आणि रोजगार संधी' या विषयावर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सीपेटचे पुष्कर देशमुख मार्गदर्शन करतील. चौथ्या आणि शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे पत्र सूचना कार्यालयावर एक सादरीकरण देतील. प्रत्येक व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या