बल्लारपूर :- रॉयल ग्रूप चिमूर तर्फे १५ डिसेंबर ला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन बालाजी सभागृहाच्या मैदानावर चिमूर येथे केले होते. त्यात बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर च्या ६० वर्षावरील खेळाडूंनी चिमूर येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तसेच ४० वर्ष वयोगटाच्या खेळाडूंनी सुद्धा प्रथम क्रमांक पटकाविला. खेळाडूंमध्ये सेवानिवृत्त कॉलरी प्रमोद आवते, सेमिउल्ला खान, सेवानिवृत्त कॉलरी शांताराम वाडगुरे, सेवानिवृत्त प्रा. महेंद्र भोंगाडे, सेवानिवृत्त प्रा युवराज बोबडे, सुरेश गोडे, प्रदीप खोडे, शिक्षक विजय कुलकर्णी, चंद्रकांत मैदमवार , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्रीनिवास उन्नावा, प्रा. डॉ सुनील कायरकर तर दुसऱ्या बीएसबीएस संघात शिक्षक रवी अन्सुरी, शिक्षक दत्तू भलवे, वन परिक्षेत्र अधिकारी संभाजी कोंडावार, मनोज सेंगर, परमेश्वर बोटला तसेच ४० वर्षीय वखालील संघामध्ये शॉनाल कायरकर, प्रफुल नांदेकर, मंथन कुकडकर, महेश पिल्ले, अंकुश चव्हाण, नारायण सुक्का व शुभम कोरडे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर करिता प्रथम क्रमांक पटकाविले. मैत्रीपूर्ण सामन्याच्या या स्पर्धेमध्ये चिमूर राजुरा चंद्रपूर बल्लारपूर गोंडपिपरी व गडचांदूर या परिसरातील खेळाडूंच्या संघांनी सहभाग घेतला.
भद्रावती चे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आवते, बाळु नंदनवार यंच्या तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. अश्या प्रकारचे मैत्रीपूर्ण सामने दरवर्षी आयोजित करण्यात येईल असे चिमूर येथील रॉयल ग्रूप चिमूर यानी घोषित केले. जिल्हा मध्यवर्ती बँक चे सदस्य संजय नवघरे यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आली. गोविंद गोहने प्रकाश वाकडे, विजय सोनवणे, बाळू नंदनवार यंनी परिश्रम घेतले. तसेच इतर सहकारी यांची ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. अश्या प्रकारची स्पर्धा नियमित सुरू राहावी यासाठी रॉयल ग्रुप चिमूर च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गावातून आलेल्या संघांना विनंती केली आहे. सर्व स्तरातील जनतेतर्फे अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्यामुळे आयोजकाचे अभिनंदन करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर च्या पटांगणावर नियमित सकाळी व संध्याकाळी सराव सुरू असतो त्यामध्ये सर्वच वयोगटातील खेळाडू नियमित सराव करीत असतात चंद्रपूर जिल्हा वॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी या सर्व खेळाडूंच्या मार्गदर्शनामध्ये योग्य हातभार लावला त्याचाच हा परिणाम आहे की ४० वर्षीय वयोगटातील आणि त्या वरील खालील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून हा विजय खेचून आणला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या