महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण (Mahatma Phule College Tribute to Dr. Manmohan Singh)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण (Mahatma Phule College  Tribute to Dr. Manmohan Singh)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या निधना पश्चात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच 26 डिसेम्बर 2024 ला रात्री 10:00 वाजताच्या दरम्यान नवी दिल्लीत उपचाराच्या दरम्यान वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले यावेळी शोक संवेदना व्यक्त करतांना डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे कोहिनुर हिरा असून त्यांनी देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली ते एक अर्थतज्ञ म्हणून ओळखले जात होते यासोबतच त्यांनी 2004 ते 2014 पर्यंत देशाचे प्रधानमंत्री होते ते जगातील उत्कृष्ट अर्थशास्त्री सोबत भारतातील आर्थिक सुधारणात त्यांचा महत्वाचा वाटा होता डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाल्याचे मत महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. स्वप्नील बोबडे यांनी व्यक्त केले. या शोक संवेदना नंतर मौन पाळून मृत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. किशोर चौरे, ले. प्रा. योगेश टेकाडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. जयेश गजरे ई सोबत एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ची उपस्थिती होती.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)