गोंडवाना विद्यापीठाद्वारे प्राध्यापकाकरिता 18 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान कलादर्पण क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन (Gondwana University organizes Kaladarpan Sports and Arts Festival for professors from 18th to 20th January 2025)
चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठाच्या व सलग्नित सर्व महाविद्यालयातील शिक्षकांच्या क्रीडा व कलागुणांचा विकास व्हावा तसेच त्यांना आपले कला कौशल्य दाखविता यावे व त्यांच्या सुप्त गुणांना संधी मि ळावी याकरिता गोंडवाना विद्यापीठ असोसिएशनच्या वतीने सत्र 2023 पासून विद्यापीठाद्वारे अत्यंत उत्साहात व खेळण्याच्या वातावरणात कला दर्पण क्रीडा व कला महोत्सव या नावाने शिक्षकांकरिता क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर महोत्सव शिक्षकांकरिता महाराष्ट्रात केवळ गुणवत्ता विद्यापीठांमध्ये केला जातो. यावेळी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोर्लावार, उपाध्यक्ष डॉ. सतीश कन्नाके व डॉ. मिलिंद भगत व इतर पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट देऊन यासंबंधी मागणी केलेली होती ही मागणी पूर्ण झाली असून सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कला दर्पण क्रीडा व कला महोत्सवामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात तयारीला लागावे असे आवाहन गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील वर्षी सदर महोत्सव मार्च महिन्यात घेतल्यामुळे आयोजक व सहभागी संघाला अनेक अडचणींना आल्या होत्या या पार्श्वभूमीवर यावर्षी जानेवारी महिन्यात सदर क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येण्याच्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांना पत्र दिले असून ही मागणी कुलगुरूंनी मान्य केली असून येत्या 18 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान सदर खेळाचे आयोजन करण्यासंबंधी विभागाला सूचना दिल्या आहेत. याकरता संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या