महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेंचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार (Maharashtra State President of Marathi Journalists Association Vasantrao Munde and State General Secretary Vishwasrao Arote's birthday will be celebrated with enthusiasm.)
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेंचा वाढदिवस १ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यात यंदाही उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी दिली आहे. बल्लारपूर तालुक्यात तालुकाध्यक्ष मनोहर दोतपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासोबत रुग्णालयात फळवाटप करण्यात येणार आहे तसेच भद्रावती तालुक्यातील पदाधिकारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार असल्याचे कळते. चिमूर तालुक्यातील पदाधिकारी अध्यक्ष केवल सिंह जूनी यांचे नेतृत्वात शासकिय रुग्णालयात भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. राजूरा तालुक्यात संघाचे जेष्ठ पदाधिकारी प़ा. डोंगे यांचे मार्गदर्शनात विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मूल तालुक्यात संघाचे तालुकाध्यक्ष सतिश राजूरवार यांनी नियोजन केले असून उपजिल्हा रुग्णालय मूल येथे सर्व रूग्णांना आवश्यक साहित्य व फळे वाटप कार्यक्रम नियोजीत करण्यात आले आहे. सावली तालुक्यात राज्य मराठी संघ शाखेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नागभिड, ब्रम्हपूरी, कोरपना, राजुरा, सावली, सिंदेवाही, वरोरा तालुक्यातील राज्य पत्रकार संघ कार्यकारणी विवीध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटें यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या