चंद्रपूर :- जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहात राहणाऱ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा तसेच या मुलांना कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांशी स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, सांस्कृतिक व मैदानी खेळामध्ये कला व कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, याकरिता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन दि. 2 ते 4 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात येत आहे. 2 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी सीमा लाडसे, महिला व बालविकास नागपूर विभाग नागपूरच्या विभागीय आयुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर आदींची उपस्थिती असणार आहे. तर 4 जानेवारी 2025 रोजी सदर स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मैदानी, इनडोअर आणि सांस्कृतिक स्पर्धां रंगणार 2 ते 4 जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या मैदानी, इनडोअर तथा सांस्कृतिक स्पर्धां पार पडणार असून जिल्ह्यातील सर्व मुलांचे-मुलींचे बालगृह आणि जिल्ह्यातील बारा शाळांमधील 1 हजार विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धा रंगणार आहे. खोखो, कबड्डी, धावणे, बुद्धिबळ, कॅरम, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, वादविवाद, रांगोळी, नृत्य, गायन, नक्कल आणि एकांकिका आदी स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.
2 ते 4 जानेवारी दरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या मैदानी, इनडोअर आणि सांस्कृतिक स्पर्धां रंगणार (The Chacha Nehru Bal Mahotsav will be organized between 2nd and 4th January to organize outdoor, indoor and cultural competitions for students.)
By -
१२/३०/२०२४ ०६:४५:०० PM
0
2 ते 4 जानेवारी दरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या मैदानी, इनडोअर आणि सांस्कृतिक स्पर्धां रंगणार (The Chacha Nehru Bal Mahotsav will be organized between 2nd and 4th January to organize outdoor, indoor and cultural competitions for students.)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या