विरूर स्टेशन जवळ रेल्वे रुळावर आढळला युवकाचा मृत्यू सदर घटना ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप (The death of a youth found on the railway track near Virur station, the family alleges that the incident was not a suicide but an accident)

Vidyanshnewslive
By -
0
विरूर स्टेशन जवळ रेल्वे रुळावर आढळला युवकाचा मृत्यू सदर घटना ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप (The death of a youth found on the railway track near Virur station, the family alleges that the incident was not a suicide but an accident)


विरूर स्टेशन :- विरूर स्टेशन जवळ एक किलो मीटर अंतरावर विरूर माकुडी दक्षिण मध्य रेल्वे मार्ग रुळावर एका युवकांची मृत्यूदेह शुक्रवारी सकाळच्या सुमारास आढळल्याने गावात एकच खळबळ माजली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे मृतकाच्या कुटुंबियांनी आरोप लावल्याने यात संशय व्यक्त होत असून गावात कुजबुज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील निलेश जितेंद्र डवरे अंदाजे वय 25 वर्ष हा गुरुवार रात्रौ 9 वाजता आपल्या घरून बाहेर गेला मात्र तो सकाळ पर्यंत घरी न पोहचल्याने त्याची शोधाशोध निलेशच्या आई वडिलांनी केले तेव्हा विरूर कब्रस्तान जवळील जंगला लगत मध्य रेल्वे रुळावर शुक्रवार सकाळच्या सुमारास आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली याची माहिती निलेश च्या कुटुंबियांना व पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून तपासणी केली असता धडपासून शीर व पाय बाजूला पडलेले आढळले व काही अंतरावर रुळाच्या खाली झुडपामध्ये रक्त रेतीने लपविल्याचे दिसून आले तेव्हा घटनेची प्राथमिक अंदाजित परिस्थिती पाहता मृतक कुटुंबीयांनि माझ्या मुलाची आत्महत्या नसून हे घातपात च असल्याचा आरोप लावला त्यामुळे गावात वेगळ्याच चर्चेला पेव फुटले व पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले सर्वप्रथम विरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद करून फॉरेन्सिक टीम व श्वान पथक बोलावून गंभीर रित्या तपास केला व संशयाच्या आधारे विचारपूस करण्या करिता तीन युवक व एका महिलेला बोलावून विचारपूस करण्यात आले खरं स्थिती काय आहे हे लवकरच समोर येईल. सदर तपास हे अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक संतोष वाकडे, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार, विजू मुंडे, अतुल सहारे हे करीत आहे.

संकलन :- अविनाश रामटेके

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)