स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, खांबाडा येथे जिल्हा SST चेकपोस्ट वर अवैद्य दारू वाहतुक विरुद्ध कारवाई 5,73,500/-रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of local crime branch, action against illegal liquor trafficker at district SST check post at Khambada seized goods worth Rs.5,73,500/- )

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- आज दिनांक 21/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. वरोरा हददीत रात्रौ गस्त पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, काही इसम एक लाल रंगाची स्विफ्ट गाडीने नागपूर - चंद्रपूर महामार्गांवर मार्गे अवैधरित्या दारुची वाहतुक करीत आहे, अशा खात्रीशीर माहीतीवरुन नागपूर - चंद्रपूर हायवे मार्गावर खांबाडा एस. एस. टी. पॉईंट जवळ नाकाबंदी करुन सदर वाहन पकडले असता त्या वाहनामध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या 21 पेटी एकूण 2100 नग 90ml मिळुन आल्या. दारूची किंमत 73,500/- ₹ व मारुती सुझुकी स्विफ्ट वाहन 5,00,000/-₹ असा एकूण 5,73,500/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.
 
        चार आरोपीतां विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अपराध क्रमांक 727/2024 कलम 65 (अ)(ई), 82, 83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमाल व सर्व आरोपीतांना पुढील तपासकामी पो. स्टे. वरोरा चे ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही पथक पोनि महेश कोंडावर, पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, पो हवा. नितीन कुरेकार, अजय बागेसर, पोशि गणेश भोयर, प्रशांत नागोसे, शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)