महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीस, सुधिर मुनगंटीवार सह दिग्गजाना उमेदवारी (BJP's first list of 99 candidates announced for Maharashtra assembly elections, veterans including Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. 

           तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चव्हान यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, बल्लारपूर मधून सुधिर मुनगंटीवार, चिमूर मधून बंटी भांगडिया, वर्ध्यातून पंकज भोयर, तर यवतमाळ मधून मदन येरोवार यांना पहिल्या यादीत संधी देण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)