आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई " अम्मा " यांचेवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार (MLA Kishore Jorgewar's Matoshree Gangubai "Amma" was cremated in a mournful atmosphere)

Vidyanshnewslive
By -
0
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई " अम्मा " यांचेवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार (MLA Kishore Jorgewar's Matoshree Gangubai "Amma"  was cremated in a mournful atmosphere)
चंद्रपूर :- चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री ' 'अम्मा' गंगुबाई जोरगेवार यांचे दिनांक २०/१०/२०२४ ला सकाळी नऊ वाजता निधन झाले. ही बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. मागील काही दिवसापासून अम्मा आजारी होत्या, त्यांचे नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अम्मा नागपूर येथे भरती असताना चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली महोत्सव सुरू होते. अशावेळी किशोरभाऊंचा एक पाय नागपुरात तर दुसरा चंद्रपुरात असायचा. अम्माच्या तब्येतीसाठी रोज रात्रोला किशोरभाऊ वेळ काढून नागपूरला जाऊन तब्येतीची काळजी घेत असत. त्यातून अम्मा थोड्या बऱ्या झाल्याने दोन दिवसांपूर्वीच डॉक्टरानी आणि घरी पाठवले. घरी त्यांना डॉक्टरांचे उपचार सुरू होते. परंतु ते ईश्वराला मान्य झाले नाही. आणि रविवारी सकाळी साडेनऊ वाजता निराधाराचा आधाराने वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अशावेळी किशोरभाऊ मुंबईत होते. अम्माचा निरोप कळताच. ते आपले काम अपुरे सोडून चंद्रपुरात परतले. अम्माच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने 'अम्मा का टिफिन' आणि 'अम्मा की दुकान' या उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळाला. अनेक निराधारांचे मातृतुल्य छत्र कायमचे हरपल्याचे दुःख सर्वांना आहे. त्या नेहमी म्हणायच्या ' काम करायला लाज कसली' मुलगा आमदार झाला तरी त्या गांधी चौकात सात मजली इमारती समोर टोपल्या विकायच्या , मेहनतीच्या पैशातून समाधान मिळतं अशा आवर्जून सांगायच्या. अशा निराधाराच्या अम्मांना हजारो अश्रूनी शांतीधाम येथे अखेरचा निरोप दिला. अनेकांनी शोक संवेदनातून आपल्या भावना व्यक्त केल्या. निराधारांचे आधार 'अम्माना' हजारोंनी अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)