धक्कादायक ! चंद्रपूरात शिक्षण घेणाऱ्या ' बिएएमएस ' च्या विद्यार्थिनीचा झोपेतच मृत्यू (Shocking ! A student of 'BAMS' studying in Chandrapur died in her sleep)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कु. आचल प्रमोद गोरे (२३) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे. आचल ही येथील विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थीनी होती. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. मात्र आज ३ ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान तिच्या रूममेटने तिला उठवले. पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा शासकीय रूग्णालय दाखल केले असता, डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. याबाबत पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण काय हे अधिक तपासानंतरच कळू शकेल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या