बल्लारपूर :- भारतीय ओबीसी महापरिषद व बहुजन समता पर्व यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरात 14 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी 5:00 वाजता एक दिवसीय ओबीसीची महापरिषदेचे आयोजन शहरातील राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे करण्यात आले आहे यासाठी मुख्य व्याख्याते म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा श्याम मानव उपस्थित राहणार असून संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव मोहिमे अंतर्गत " भारतीय संविधान आणि आजच्या ओबीसीची दशा आणि दिशा " विषयावर मार्गदर्शन करणार असून या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून मा. आ.सुधाकर अडबाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. आ. एड. अभिजित वंजारी उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. दशरथ मडावी, मा. डॉ. दिलीप कांबळे, प्रा. रामभाऊ महाडोळे, डॉ. रजनीताई हजारे, विजय नळे, राहुल सोमणकर, एड. मेघा भाले ई उपस्थित असणार आहेत या माध्यमातून ओबीसीची जातनिहाय जणगणना, मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसीची वसतिगृह सुरु करावी ई मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहे. अशी माहिती ओबीसी महापरिषदेचे आयोजक व बहुजन समता पर्व तसेच भारतीय ओबीसी महापरिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांनी बल्लारपूर येथे विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली असून या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या