भोई समाजाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषीं जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर व कोजागिरी उत्सवाचे आयोजन (Organized blood donation camp and Kojagiri festival on the occasion of Maharishi Valmiki Rishi Jayanti on behalf of Bhoi Samaj.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- भोई समाज संघ बल्लारपूर वतीने श्री वाल्मीक ऋषी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी (दि.18) संताजी लॉन येथे रक्तदान शिबिराचे व भोई समाज कोजागिरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 32 नागरिकांनी रक्तदान केले. समाजसेवेचे व्रत डोळ्यांसमोर ठेवून ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे आहे, याचे भान ठेवून शासकीय रक्तपेढीतील रक्ताची कमतरता पाहून या शिबिराचे आयोजन भोई समाजाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

      तसेच सायंकाळी कोजागिरी उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर महिला व बालकांची उपस्थिती होती यावेळेस विविध विषयात प्रविण्य प्राप्त करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भोई समाज संघाचे अध्यक्ष अशोक गर्गेलवार, सुभाष कोतपल्लीवर, दीपक मांढरे, राकेश मांढरे, बंडू झिल्लला, संतोष भोयर, सुरेश घुबडे, सोनू ठमके, दिनेश गोंदे, मनोज गर्गलवार, अजय तामखाने, सुरेश वाघाडे, उमेश वाघाडे, निखिल पोहणे, शुभम मडामे आदींची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगतB, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)