नागपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आज नागपूरच्या दीक्षाभूमीहून "दीक्षाभूमी ते चैत्यभूमी" अशी संविधान जागरण रॅली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. आज सकाळी 11 वाजता बसपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथील तथागत बुद्धांना व बाबासाहेबांना वंदन करून या रॅलीची सुरुवात केली. ही रॅली महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात फिरत-फिरत 9 ऑक्टोंबर रोजी मान्यवर कांशीरामजींच्या परिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर पोहोचून तिथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर बसपाचे केंद्रीय नेते व महाराष्ट्राचे प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनात धारावी येथे रॅलीचा समारोप होईल. आजच्या रॅलीत प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष शिन्दे, प्रदेश महासचिव डा मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, पृथ्वी शेंडे, नागोराव जयकर, मुकुंद सोनवने, हुलगेश चलवादी, प्रदेश मिडिया प्रभारी उत्तम शेवडे, प्रदेश कोषाध्यक्ष रहूफभाई, प्रदेश सचिव विजय काळे, कालुराम चौधरी, सुदीप गायकवाड, अनिरुद्ध रणवीर, प्रा सुनील कोचे, नागपुर जिलाध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, राजकुमार बोरकर, किशोर गेडाम, उपाध्यक्ष इब्राहिम टेलर, महासचिव चंद्रशेखर कांबळे, अभिलेश वाहने, राजू चांदेकर, भन्ते संघरत्न, महिला नेत्या सुनंदाताई नितनवरे आदि प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. रॅली दीक्षाभूमीवरून लोकमत चौक मार्गे संविधान चौकात पोहोचल्यावर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. संविधान चौकात मागील अनेक दिवसापासून आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वतीने आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषण सुरू असल्याने त्यांच्या उपोषण मंडपाला बसपा नेत्यांनी भेट दिली. त्यानंतर इंदोरा चौकात बॅरिस्टर खोब्रागडे यांना माल्यार्पण केल्यानंतर उत्तर नागपूरचे जेष्ठ कार्यकर्ते बुद्धम् राऊत यांच्या माध्यमातून क्रेन द्वारे फुलांचा वर्षाव करून नेत्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बॅरिस्टर खोब्रागडे सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर रॅली कळमना मार्गे, पारडी चौकात आल्यावर भंडाऱ्याकडे रवाना झाली. रॅलीत पन्नासावर फोर व्हीलर व शेकडो टू व्हीलर गाड्या सहभागी झाल्या होत्या. संविधान रथ हे रॅलीचे आकर्षण होते. संविधान रथासोबत असलेले बसपा नेते मार्गावरील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बहुजन समाजासाठी पोषक असलेले भारतीय संविधान व फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या बसपाची भूमिका तसेच बहुजन विरोधी व संविधान विरोधी काँग्रेस-भाजपची भूमिका समजावून सांगण्याचे कार्य करतील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या