धक्कादायक ! पोलिसांची भिती दाखवित वन कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने 8 लाख रु ची फसवणूक (Shocking ! Financial fraud of Rs 8 lakh by forest employees showing fear of police)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! पोलिसांची भिती दाखवित वन कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने 8 लाख रु ची फसवणूक (Shocking ! Financial fraud of Rs 8 lakh by forest employees showing fear of police)


बल्लारपूर :- वन विभाग मध्ये कार्यरत एका कर्मचाऱ्याला पोलिसांची भीती दाखवत ८ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे विरूर वनपरीक्षेत्रात वनविभागात कार्यरत कर्मचारी असून ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत त्यांना अनोळखी मोबाईल नंबर वर ट्राई चे नावाने कॉल आला. त्यांना सांगण्यात आले की तुमचा आधार कार्ड चे संबधित सगळे मोबाईल नंबर बंद करण्यात येईल. त्यांना एक नंबर सांगण्यात आले व या नंबर असामान्य कॉल झाले असून तुमच्यावर नवी दिल्ली गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली असून तुम्हाला व्यक्तीश यावे लागेल. त्यावर त्या कर्मचारीने संपर्क केले असता त्या बनावट कॉलर नी गोपनीयता भाग म्हणून सीबीआय इंडिया सी सहकार्य करावयाचे असून तुमचे सर्व फिक्स डिपॉजिट, म्यूचुअल फंड व पगार बचत करीता सर्वोच्च न्यायालय च्या वकिलामार्फत भारतीय रिझर्व बँकेच्या संरक्षणात द्यायचे असल्याने ते सादर करावे असे त्या कॉलर ने म्हंटले. त्या अधिकाऱ्याने भीतीपोटी कॉलर ने दिलेल्या नंबर वर ७ लाख ९० हजार रुपये आरटीजीएस केले. तसेच फोन पे द्वारे मोबाईल नंबर २० हजार रुपये दिले असे एकूण ८ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. संबधित वन विभाग कर्मचाऱ्याने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे २१ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केले. बल्लारपूर पोलीसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत ६६ (क), ६६(ड) ची गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील वी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)