दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, गणित व विज्ञान विषयात 35 ऐवजी 20 च्यावर गुण मिळाले तर होणार 11 वी मध्ये प्रवेश (A big change in class 10th exam, if you score above 20 instead of 35 in maths and science, you will be admitted to class 11.)

Vidyanshnewslive
By -
0
दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, गणित व विज्ञान विषयात 35 ऐवजी 20 च्यावर गुण मिळाले तर होणार 11 वी मध्ये प्रवेश (A big change in class 10th exam, if you score above 20 instead of 35 in maths and science, you will be admitted to class 11.)


वृत्तसेवा :- दहावीच्या परीक्षेत गणित व विज्ञान या दोन विषयांची विद्यार्थ्यांना कायमच भिती असते. मात्र ही भिती घालविण्यासाठी सरकारने एक निर्णय घेण्याचे ठरवले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार नव्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार गणित व विज्ञान या विषयाच्या पास होण्याच्या आराखड्यात काही बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे. बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरीही विद्यार्थ्याला पुढील शिक्षण घेता येणार आहे. त्याला अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. मात्र, त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येईल. प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर असणार आहेत. दहावीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांसंबंधी काही म्हटवाचे बदल करण्यात आले आहेत. दहावीत प्रत्येक विषयात पास होण्यासाठी 35 गुण प्राप्त करणे आवश्यक असते. मात्र, आता दोन विषयांसाठी हा नियम बदलण्यात येऊ शकतो. पण, हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर आता शिक्षण क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहे. मात्र त्यात नकारात्मक प्रतिक्रीया जास्त आहेत. जागतिक प्रतवारीचे जे अभ्यास होतात त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा ठरवला जातो. याबाबत 2020 साली भारत हा 33 व्या क्रमांकावर होता. आता पुढच्या काळात तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळणार आहेत. यासाठी गणित आणि विज्ञान हे अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक विषय आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त पास करण्यापेक्षा जास्त ज्ञान आणि कौशल्य मिळतील, असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. गणितात पास करण्यापेक्षा गणिताची गोडी कशी लागेल, सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल? याचा विचार केला गेला पाहिजे, असं काही तज्ज्ञांचे मत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)