बल्लारपूर मतदार संघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, महायुतीच्या आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना कोण लढत देणार? (From Ballarpur Constituency, Maha Vikas Aghadi is in a tug of war. Who will fight Sudhirbhau Mungantiwar?)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर मतदार संघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, महायुतीच्या आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना कोण लढत देणार? (From Ballarpur Constituency, Maha Vikas Aghadi is in a tug of war. Who will fight Sudhirbhau Mungantiwar?)


चंद्रपूर : जिल्ह्यातील सहापैकी बल्लारपूर व चिमूर मतदारसंघात महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले. आता महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरविते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. बल्लारपूर मतदारसंघावर मागील १५ वर्षांपासून सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व आहे. त्यांना कडवी झुंज देण्यासाठी महाविकास आघाडीला दमदार उमेदवार द्यावा लागेल, असे एकंदर चित्र आहे. मागील तीनही निवडणुकीचा इतिहास बघता या मतदारसंघात काँग्रेसने राहुल पुगलिया, घनश्याम मुलचंदानी, डॉ. विश्वास झाडे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरविले होते. यावेळी मुलचंदानी आणि डॉ. झाडे ही मंडळी तिकिटाची मागणी करीत आहेत. यासोबतच संतोषसिंह रावत, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. संजय घाटे यांनी फिल्डिंग लावली आहे. तसेच उद्धवसेनेनेही येथे जोर लावला असून, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात एक जागा उद्धवसेनेला जाईल, अशीही चर्चा असून, बल्लारपूरवर अधिक जोर असल्याचेही बोलले जात आहे. एकूण महाविकास आघाडीत या जागेवरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरविले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर यांची दावेदारी आहेत. येथे काँग्रेसकडे दुसरा दमदार उमेदवार से दिसत नसला तरी येथे उद्धवसेना आपला दावा करीत आहे. दादा दहीकर यांच्यासाठी उद्धवसेना आग्रही असल्याची चर्चा आहे. परंतु येथे उद्धवसेनेपेक्षा काँग्रेसची दावेदारी प्रबळ असल्याने ही जागा काँग्रेसकडेच राहतील, अशीही चर्चा आहे. भांगडिया हे तिसऱ्यांदा निवडणूक लढतील. तर दुसरीकडे किशोरभाऊ जोरगेवार अजूनही द्विधास्थितीत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.कारण भाजपकडून जोरगेवारांची चर्चा चंद्रपूर मतदारसंघातील राजकीय घडामोडी दिवसागणिक बदलत आहे. किशोर जोरगेवार हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून लढतील, अशी चर्चा सुरू होती. पक्षप्रवेशासाठी ते मुंबईत गेल्याची चर्चा होती. दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांना परतावे लागले. दरम्यान, भाजपत खलबते झाली आणि चंद्रपुरातून जोरगेवार यांना मैदानात उतरवायचे, अशी रणनीती ठरल्याची गुप्त चर्चा चंद्रपुरात ऐकायला मिळत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत वाच्यता झालेली नसून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून लवकरच महाविकास आघाडी व महायुती च्या इतर उमेदवारांची घोषणा अपेक्षित आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 942171768

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)