नागपुरात शालिमार एक्सप्रेसचा अपघात 3 डब्बे रुळावरून घसरले, सुदैवाने जीवितहानी टळली (Shalimar Express accident in Nagpur, 3 coaches derailed, fortunately no casualties)

Vidyanshnewslive
By -
0
नागपुरात शालिमार एक्सप्रेसचा अपघात 3 डब्बे रुळावरून घसरले, सुदैवाने जीवितहानी टळली (Shalimar Express accident in Nagpur, 3 coaches derailed, fortunately no casualties)


नागपूर :- राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकी सोबतच दिवाळीची धामधूम सुरू झाली असतांना लाखो चाकरमान्यांना गावाचे वेध लागले आहे. अशातच नागपूरमध्ये रेल्वे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज दुपारच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. कुर्ला- शालिमारकडे एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे पटरीच्या खाली उतरले. यात एस टू आणि पार्सलचा दोन डबे आहे. एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाचे काम सुरू आहे. दरम्यान दिल्ली या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत झालेल्या आहे. तसेच काहीं गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. दुरुस्तीचं काम हे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)