वाघनखे विक्री करणाऱ्या दोन इसमांकडून ०२ नग वाघाची नखे जप्त स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कामगिरी (02 tiger claws seized from two ISs selling tiger claws Performance of Local Crime Branch, Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
वाघनखे विक्री करणाऱ्या दोन इसमांकडून ०२ नग वाघाची नखे जप्त स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कामगिरी (02 tiger claws seized from two ISs selling tiger claws Performance of Local Crime Branch, Chandrapur)


चंद्रपूर :- चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. दरम्यान सदर पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, काही इसमांची टोळी वाघ या वन्यप्राण्याची नखे विक्री करण्याकरीता चंद्रपुर येथील गिरीराज हॉटेलसमोर येणार आहे. नमुदचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर माहिती पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना कळूवन त्यांचे आदेशान्वये कोर्टासमोरील गिरीराज हॉटेल येथे सापळा रचून वाघ या वन्यप्राण्याची नखे विक्री करण्याकरीता आणलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ०२ नग वाघाची नखे जप्त करण्यात आली. आरोपी नावे :- १) नंदकिशोर साहेबराव पिंपळे, वय ५१ वर्ष, धंदा मजुरी, रा. सिव्हील लाईल, रामनगर, चंद्रपुर, २) रविंद्र शिवचंद्र बोरकर, वय ६५ वर्ष, रा. नगीनाबाग, गुरांचे दवाखान्यासमोर, चंद्रपुर वर नमुद दोन्ही आरोपी व वाघनखे पुढिल कार्यवाहीकरीता मा. सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग चंद्रपुर यांचे ताव्यात देण्यात आले, सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा. नितीन कुरेकार, पोहवा. दिनेश अराडे, पो.अं. प्रशांत नागोसे, स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे. अशी माहिती पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)