चंद्रपूरातून किशोर जोरगेवार तर बल्लारपूर मतदार संघातून आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार आज भरणार मूल मध्ये उमेदवारी अर्ज, शकतीप्रदर्शनातून दाखविणार ताकत (MLA Kishore Jorgewar from Chandrapur and MLA Sudhirbhau Mungantiwar from Ballarpur Constituency will file their nomination papers today, they will show their strength through power demonstration.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरातून किशोर जोरगेवार तर बल्लारपूर मतदार संघातून आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार आज भरणार मूल मध्ये उमेदवारी अर्ज, शकतीप्रदर्शनातून दाखविणार ताकत (MLA Kishore Jorgewar from Chandrapur and MLA Sudhirbhau Mungantiwar from Ballarpur Constituency will file their nomination papers today, they will show their strength through power demonstration.)
चंद्रपूर :- आमदार मा.श्री किशोर भाऊ जोरगेवार यांचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांचे आवाहन चंद्रपूरचे अपक्ष आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार हे भाजपचे उमेदवार म्हणून 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता चंद्रपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात  भाजप प्रवेशानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 12 वाजता गांधी चौक चंद्रपूर येथून भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे, जिल्हाध्यक्ष उमेश बोडेकर, चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुरजसिंह ठाकूर यांनी सर्व कार्य सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 
                मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात निर्माण करणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार येत्या सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सलग सातव्या विजयासाठी सज्ज झालेले ना. श्री. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच चाहते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार २८ ऑक्टोबरला (सोमवारी) सकाळी ११.०० वाजता मुल येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुती घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे. यावेळी अर्ज भरण्यापूर्वी ना. श्री. मुनगंटीवार मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन बाजार चौक मुल येथुन उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे.विविध विकासकामांच्या माध्यमातून मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा ना. श्री. मुनगंटीवार यांनी बदलला आहे. बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करताना संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेईल एवढी विकासकामे केली. बल्लारपूर, मुल व पोंभूर्णा येथे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांगिण विकासाचे धोरण राबविण्यावर ना. श्री. मुनगंटीवार यांचा भर राहिलेला आहे. अगदी विरोधकही त्यांचा विकासाचा झंझावात मान्य करतात. शेतकरी बांधव असोत, महिला असोत किंवा तरुणवर्ग असो प्रत्येकाच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी ना. श्री. मुनगंटीवार सदैव अग्रेसर असतात. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहे. आता २०२४ च्या निवडणुकीतही ते विजयासाठी सज्ज झाले आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)