बल्लारपूर शहरातील किल्ला वॉर्डात चोरीची घटना, १५ तोळे सोने व २५ तोळे चांदी चे दागिने व नगद २ हजार रुपये असे ८ लाख १५ हजार रु चोरी (Theft incident in Killa Ward of Ballarpur city, 15 tola gold and 25 tola silver ornaments and 2000 rupees in cash were stolen.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- गुरुवार १२ सप्टेंबर रोजी रात्री किल्ला वॉर्डातील रहिवासी मालन श्रीहरी सातपुते या आपल्या संपूर्ण कुटुंबासह गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातील नातेवाईक यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गेल्या असता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून अंदाजे १५ तोळे सोने व २५ तोळे चांदी चे दागिने व नगद २ हजार रुपये असे ८ लाख १५ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेले आहे. या घटनेची माहिती मालनबाई यांना त्यांचे नातू साई अनिल ढोंगे यांनी दिली. शहरातील किल्ला वॉर्ड येथे एका घराचे कुलूप तोडून अंदाजे ८ लाख रुपयाचे सोने, चांदीचे दागिने व नगद २ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली. साई ढोंगे वर घराच्या रक्षणाची जबाबदारी सोपवून ते करंजी ला गेले होते. मात्र, हा नातूही रात्री घराबाहेर होता. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तुटलेली दिसल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह करत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)