शाळेच्या शिक्षिकेच्या पाण्याच्या बाटलीत दारू टाकल्याच्या संशयावरून विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल (Students were beaten up on suspicion of putting alcohol in the school teacher's water bottle, a case was registered against the teacher)
चंद्रपूर :- येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेने सातव्या वर्गातील आठ विद्यार्थ्यांना मारहाण केली. यातील दोन विद्यार्थ्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवार (ता. २८) घडली असून, शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे.व्याहाड खुर्द येथे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शनिवार (ता. २८) नेहमीप्रमाणे शाळा भरली. शिक्षकांनी आपापल्या वर्गावर जाऊन शिकविण्यास सुरवात केली. दुपार एकच्या सुमारास इंग्रजी विषयाच्या शिक्षिका उज्ज्वला पाटील सातव्या वर्गात शिकविण्यास गेल्या. त्यांनी पाणी पिण्याकरिता स्वतःची बाटली सोबत आणली होती. शिकवत असतानाच त्यातून पाणी पीत असताना त्यांना बाटलीमधून दारूचा वास आला. आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत दारू मिसळवल्याच्या संशयावरून शिक्षिकेने या विद्यार्थ्यांना मारहाण केली. यातून त्यांनी वर्गात उपस्थित असलेल्या एकूण १९ विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. मात्र, यात काहीच आढळले नाही. यामुळे संतापून त्यांनी आठ विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात दोन विद्यार्थ्यांना जबर दुखापत झाली. त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालक शाळेत दाखल झाले. यामुळे एकच गोंधळ उडाला. पालकांनी घटनेची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखही आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. विस्तार अधिकारी किशोर बारसागडे, केंद्र प्रमुख किशोर येनगंटीवार यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याकरिता वरिष्ठांकडे अहवाल पाठविला. यानंतर ठाणेदारांनी शिक्षिका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणी पिण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकण्यात आल्याचे मला विद्यार्थ्यांकडूनच माहीत झाले. मला त्या विद्यार्थ्यांची नावे ठाऊक आहेत. त्यांना शिक्षा म्हणून मारले. ही घटना माझ्यासोबत तिसऱ्यांदा घडली. असे त्या शिक्षिकेनी म्हटले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या