घुग्गुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे अदानी ग्रुपला हस्तांतरण थांबवा, काँग्रेस नेते राजू झोडे (Stop transfer of Mount Carmel Convent High School in Ghuggus to Adani Group, Congress leader Raju Zode)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथील माउंट कारमेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे हस्तांतरण थांबवा अशी मागणी काँग्रेस नेते राजू झोडे यांनी केली असून नागरिकांना सोबत घेउन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. घुग्गुस येथील माउंट कारमेल कॉन्व्हेंट शाळेचे अदानी ग्रुपला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही अतिशय संतापजनक प्रक्रिया असून याविरोधात आजी माजी विद्यार्थी व पालकांनी रोष व्यक्त केला आहे.ही शाळा गुणवत्तापूर्ण योगदानासाठी ओळखली जाते असून या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहे.त्यामुळं अदानी ग्रुपला ही शाळा हस्तांतरित झाल्यास येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असून सुरळीत सुरू असलेले संस्थांवर सरळ अतिक्रमण करणे अदानी समूहाचा डाव आहे. त्यामुळं ही शाळा अदानी समूहाला हस्तांतरित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेते राजू झोडे बापूभाई अंसारी पंचशिल तामगाडगे अनुरूप पाटिल प्रफुल्ल मेश्राम यांनी दिला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)