बल्लारपूर येथे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक (Peace committee meeting in police station on the occasion of festival at Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर येथे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक (Peace committee meeting in police station on the occasion of festival at Ballarpur)


बल्लारपूर :- येत्या काळात अनेक सण उत्सव जसे पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद असे सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच बल्लारपूर शांततेसाठी प्रसिध्द आहे. शहराचे असेच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे होण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील वी. गाडे यांनी केले. सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टकरीता किमान एक स्वयंसेवक, मुर्ती आणि मंडपाच्या संरक्षणासाठी नेमावा. सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक मंडळाने मंडप उभारतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजे चा आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. मिरवणुकीचा मार्ग ठरवून दिले त्याच मार्गाने विसर्जन करीता जावे. सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या वेळेतच विसर्जनाची मिरवणूक काढावी. कोणत्याही धार्मिक स्थळासमोर किंवा रस्त्यावर विनाकारण मिरवणूक थांबवू नये, त्या सतत पुढे नेऊन रस्ता मोकळा करावा. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. या वेळी पोलीस पाटील, महिला दक्षता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे सदस्य, डी जे वादक उपस्थित होते. पोलीस स्टेशन च्या प्रांगणात पोलिस दलातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैभव जोशी, महावितरण चे अभियंता दिपक खामनकर यांची उपस्थिती होती. या वेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, जिल्हा शांतता समितीचे सदस्य काशीनाथ सिंह, शिवचंद त्रिवेदी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)