धम्मदिक्षा सोहळ्याच्या निमित्ताने दीक्षाभूमीवरील धम्ममंचावर राजकीय पुढारी दिसणार नाहीत (On the occasion of Dhammadiksha ceremony, political leaders will not be seen on the Dhamma Mancha at Diksha Bhoomi)
नागपूर :- येत्या 12 ऑक्टोबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या धम्मदिक्षा सोहळ्याच्या धम्ममंचावर कोणत्याही राजकीय पुढारी व व्यक्तींना बोलविणार नसल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला असल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात विचार व्यक्त करतांना ते म्हणालेत की, " धम्मदिक्षा सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली असून यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्ममंचावर बौद्ध भिक्षुशिवाय कुणीही बसणार नाही. राजकीय व्यक्तींना निमंत्रण न देण्याचा निर्णय समितीने घेतला असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलश व दीक्षाभूमी वरील दर्शन राजकीय पुढाऱ्यासह सर्व जनतेस खुले राहील. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने जागेच्या सपाटीकरणाचे कार्य ही युद्ध स्तरावर करण्यात येईल असेही मत व्यक्त केले." या पत्रकार परिषदेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त भदंत नाग दीपाकर, विलास गजघाटे, एन.आर.सुटे ई ची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या